नांदेड,(प्रतिनिधी)-शीख समाजाबद्दल दहशतवादी असे वादग्रस्त वक्तव्य करुन शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अभिनेत्री कंगणा रानौत या महिलेवर भारतीय संविधानाचा अपमान करणे, धार्मिक विश्वासाचा अपमान करणे, जातीय दंगल होण्याची शक्यता निर्माण करणे आदी सदराखाली गुन्हा दाखल करावा, असे निवेदन शीख समाजातील वकिल मंडळींनी आज दिले आहे.
भारतीय संविधानात सर्वांना समान अधिकार आहेत. या विरोधात कंगणा रानौतने १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे परत घेतल्यानंतर इंस्टाग्रामवर खलिस्तानी दहशतवादी आज सरकारवर हावी झाले असतील पण त्यांनी एका महिलेला विसरु नये असे शब्द लिहून अत्यंत चुकीच्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या इंस्टाग्रामवरील इंग्रजी भाषेतील प्रत निवेदनासोबत जोडली आहे. कंगणा रानौतने शासनावर, एका जातीबाबत अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे तिच्याविरुध्द कार्यवाही करावी असे या निवेदनात लिहिले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, पोलीस निरीक्षक वजिराबाद आणि सायबर सेल यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर अॅड.स.सुरेंद्रसिंघ लोणीवाले, अॅड.स.राजवंतसिंघ कदम, अॅड.स.कुलदिपसिंघ पुजारी, अॅड.स.जोगींदरसिंघ खालसा, अॅड.स.मनप्रितसिंघ ग्रंथी, अॅड.स.प्रदीपसिंघ चव्हाण, अॅड.स. मुन्नासिंघ विष्णूपुरीवाले, अॅड.स.निहालसिंघ सुखमणी, अॅड.स. अमनपालसिंघ कामठेकर, अॅड.स. रामसिंघ मठवाले, अॅड.जसप्रितसिंघ निर्मले, अॅड.स्वर्णसिंघ कामठेकर, अॅड.प्रभज्योतसिंघ रामगडीया, अॅड. स.सिमरनजितसिंघ असर्जनवाले, अॅड.सरबजितसिंघ शाहु आणि अॅड.नविद पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.