खड्याने घेतला महिलेचा निष्पाप बळी; पार्डी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्गावरील घटना

अर्धापूर (प्रतिनिधी) – नांदेड-वारंगा राष्ट्रीय महामार्गाची आवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. यातच आपल्या मुलासोबत जाणाऱ्या एका मातेचा दुर्देवी मृत्यू खड्यांमुळे झाला असे म्हणावे लागेल.
अर्धापूर ते वारंगा हा रस्ता अतिशय खराब आणि खड्‌ड्याचा झाला असुन या राष्ट्रीय माहामार्ग रस्याची चाळणी झाल्याने प्रवाश्यांना जिव मुठीत धरून प्रवास करावा  आहे.यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पार्डी ( म ) पाटी जवळ खड्‌ड्यामुळे दुचाकी उसळून मोटरसायकल पाठीमागे बसलेली महिला पडल्याने त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागला त्यांना उपचारासाठी अर्धापूर येथील रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
नांदेड – नागपूर 361 राष्ट्रीय महामार्गावर पार्डी परिसरात दि.24 बुधवारी रोजी 8:30 वा.च्या सुमारास घटना घडली असून मोटरसायकलवर कळमनुरी ते नांदेड कडे जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला खाली पडल्याने डोक्याला जब्बर मार लागला असता घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले व जखमींना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी जनाबाई मारोती खोकले (53) रा.सहस्त्रकुंड शासकीय आदिवासी आश्रमशाळा बोधडी यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.यावेळी घटना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एन.दळवी,सपोउपनी आत्मानंद वेदपाठक,जमादार सुनिल कांबळे,महामार्गाचे पोलीस कर्मचारी गणेश शेळके,सतिश श्रीवास्तव,शेख माजीद,वसंत सिनगारे यांनी जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.
एकेरी वाहतूक व नादुरुस्त रस्त्याच्या निष्पाप बळी

अत्यंत वर्दळीचा असणाऱ्या या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी रस्त्याच्या एकतर्फा वाहतुक सुरू आहे.मोठ्या प्रमाणात वाहतूक असुन गुत्तेदार व संबंधित प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष होत आहे असी चर्चा वाहन चालकांमधुन होत आहे.
बेजबाबदार गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा..

नागपूर महामार्गाचे काम सुरू असून, संबंधित गुत्तेदाराने एका बाजूचा रस्ता दुरुस्ती न करता काम सुरू केले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागल्याने त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ओबीसी हक्क परिषदेचे सखाराम क्षीरसागर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *