नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्याच्या पार्श्र्वभूमीवर रक्तदान करूनच खरी श्रध्दांजली वाहुया असे आवाहन शिवसेनेचे तालुकासंघटक नवनाथ काकडे यांनी केले आहे.
मागील अनेक वर्षांपासून हस्सापूर येथे शिवसेनेच्यावतीने 26/11 या दहशतवादी हल्ल्या विर मरण पत्कारलेल्या अधिकारी व जवांनाना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम रक्तदान करून आयोजित केला जातो. या कार्यक्रमात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदाच्या कार्यक्रमात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्रीराम मंदिर हस्सापूर, वाघी रोड तालुका जि.नांदेड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आनंदाराव जाधव, आ.बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, धोंडू पाटील, मनोज भंडारी, प्रकाश मारावार, दत्ता पाटील, उमेश मुंडे, आनंद बोंढारकार, पप्पु यादव, नेताजी भोसले, अशोक उमरेकर, माधव पावडे, महेश खेडकर, सचिन किसवे, जयवंतराव कदम, बाळू सातोरे, बाबूराव वाघ, माधव महाराज हिंगमिरे, संतोष भारसावडे, गणेश बोकारे, पांडूरंग शिंदे यांच्यासह जनतेने सुध्दा या कार्यक्रमात उपस्थित राहून रक्तदानाच्या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन नवनाथ काकडे यांनी केले आहे.
26 नोव्हेंबर रोजी हस्सापूर येथे रक्तदानाच्या माध्यमातून 26/11 च्या शहिदांना श्रध्दांजली