गुडगुडीच्या जुगाराला आता लॉटरी असे नाव देवून शुभारंभ करण्यात आला नवीन धंदा

नांदेड (प्रतिनिधी)-गुडगुडीमध्ये चालवला जाणारा पुर्वाश्रमीचा जुगार आता आधुनिक काळात संगणकावर सुरू झाला आहे. सोबतच त्यात कोणता नंबर तिथे आला पाहिजे याचीपण सोय करण्यात आली आहे. तरीपण हा लॉटरीचा जुगार खेळण्यासाठी भरपूर मंडळी आपले नशीब आजमावण्याच्या आशेखाली तेथे जात आहेत. जुगार खेळणारा आजपर्यंत कधीच श्रीमंत झाला नाही हे सर्व जगाला माहित असतांना सुध्दा या गुडगुडी वजा लॉटरी दुकानावर अत्यंत कमाई होत आहे ही कमाई लॉटरी जुगार चालकांची आहे जुगार खेळणाऱ्यांची नाही.
जुगार खेळण्याचे अनेक प्रकार अर्वाचिन कालखंडापासून सुरू आहेत. त्यावेळी फक्त नशिबाच्या नावावर त्या जुगारांचे महत्व होते. जुगार वेगवेगळ्या पध्दतीचे होते. महाभारत काळापासून त्याला एक स्वरुप प्राप्त झाले. पहिल्यांदा महाभारतात चौसर वापरली गेली. या चौसरीच्या आकाराला कमी करून तो प्रकार गुडगुडीमध्ये आला. या शिवाय सुध्दा अनेक प्रकारचे जुगार आहेत. ज्याचे वर्णन आता करणे विषयोचित नाही.
नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात नव्याने लॉटरी जुगार सुरू झाला आहे. एका संगणकाच्या माध्यमातून एक डिस्प्ले सिक्रीनवर आकडे दिसतात. शुन्य ते नऊ असे दहा आकडे त्या सिक्रीनवर दिसतात. या जुगाराला लॉटरी असे नाव देण्यात आले आहेत. आपले नशीब आजमावन्याच्या नावावर या अशा दुकानांमध्ये अनेक जण येतात. तेथे गर्दी झाली तर एकदा नाही झाली तर अनेकदा ही जुगाराची संगणकीय चौसर फिरवली जाते आणि एका आकड्यावर ही चौसर थांबते त्यासाठीचे प्रोग्रॉम फिक्स आहेत. संगणकाच्या माध्यमातून काय-काय करता येते याचा पाहिले असता गुडगुडीच आता संगणकाच्या माध्यमाने लॉटरी झाली आहे.
प्राप्त झालेल्या एका दुकानांच्या फोटोमध्ये या दुकानात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. बेकायदेशीर कामाला सुध्दा सीसीटीव्ही सुरक्षा आवश्यक असल्याचे यावरुन समोर आले. संगणकाच्या माध्यमातून कोणत्या आकड्यावर ही गुडगुडी थांबावी याचे नियोजनपण त्या संगणकीय लॉटरीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. जुगार खेळणारा कधीच जुगाराच्या खेळात श्रीमंत झालेला नाही. लॉटरीच्या नावाखाली पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या लुटीचा एक नवीन धंदा नांदेड शहरात आणि जिल्ह्यात सुरु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *