प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढणारी प्रेयसी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या प्रेमात अडचण ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून जीवघेणा हल्ला करण्यास लावणाऱ्या महिलेला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कृष्णूर येथील पानपट्टी चालक आनंद माधवराव जाधव  याचे पत्नी किरण जाधवचे प्रेम प्रकरण साहील पांडे नावाच्या युवकाशी होते. आपले प्रेमप्रकरण सुचारू रुपाने चालावे यासाठी किरण जाधवने आपला प्रियकर साईल पांडेला नवरा आनंद माधवराव जाधव (26) याचा काढण्याचे खलबत रचले. 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास माझ्या मामाचा मुलगा आला आहे आणि तुम्हाला बोलवत आहे असे नवरा आनंद जाधवला सांगितले. आनंद जाधव म्हणाला मी कुठे ओळखतो तर किरण म्हणाली की, ते तुम्हाला ओळखतात. आनंद जाधव बाहेर आला तेंव्हा दोघांनी त्याला दुचाकीवर बसवून कृष्णूर एमआयडीसीजवळील रामदेव ढाब्याच्या पाठीमागे तलावाजवळ मोकळ्या जागेत नेले आणि कत्ती आणि कुऱ्हाड अशा शस्त्रांनी त्याच्या डोक्यात, खांद्यावर मारून जबर जखमा केल्या. जखमी आवस्थेतील आनंद जाधव रस्त्यावर पळत आला तेंव्हा त्याला ओळखणाऱ्या लोकांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेले.
कुटूंर पोलीसांनी आनंद माधवराव जाधव यांच्या तक्रारीवरुन त्यांचीच पत्नी किरण जाधव, प्रियकर साहील पांडे आणि त्याचा मित्र किरण काळम या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 235/2021 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 307, 326, 120(ब) जोडण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
जीवघेणा हल्ला प्रकरणातील महिला आरोपी किरण आनंदा जाधव तिला पोलीसांनी पकडले आणि त्यानंतर महिलेला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. महिलेची पोलीस कोठडी उद्या दि.27 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *