नांदेड,(प्रतिनिधी)- मुंबई हल्ल्यात २६/११ रोजी शाहिद झालेल्या अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ आजोजित रक्तदान शिबिरात आज हस्सापूर येथे १२४ रक्तदात्यांची आपले रक्तदान केले.
मुंबई येथे 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना नांदेड शहरापासून जवळच असलेल्या हस्सापुर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून संविधान दिनानिमित्त संविधान वाचन करून 124 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 200 जणांनी आरोग्य शिबीर व दंत तपासणी शिबीरात तपासणी केली,मतदान नोंदणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कर्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी आ.बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, तालुका प्रमुख जयंतराव कदम, सभापती बबनराव वाघमारे, सरपंच देविदास सरोदे, प्रवक्ते माधव महाराज हिंगमिरे, मारोती पवार ,रमेश कोकाटे, विधानसभा संघटक बाबुराव वाघ, प्रदीप गुब्रे, माधव शिंदे,संतोष भारसावडे, गणेश बोकारे ,गणेश बोकारे, रंगनाथ सरोदे बळीराम सरोदे, पांडुरंग शिंदे ,डॉ सचिन पाटील सुगांवकर ,डॉ प्रियंका पाटील सुगांवकर, डॉ शेख परवीन, शाखाप्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
संविधान दिन आणि 26/11 शहिदांना अभिवादन करत 124 जणांनी केले रक्तदान