नांदेड (प्रतिनिधी)- येथील बोधी फाउंडेशनचा बोधी जीवन गौरव पुरस्कार श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर यांना जाहीर झालेला पुरस्कार रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिडको येथील आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.याच सोहळ्यात डॉ. सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या पेटलेली माणसे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या समारंभास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पी. टी. जमदाडे, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. संग्राम जोंधळे, प्रसिद्ध विचारवंत डॉ. अनंत राऊत,कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे, माजी परिवहन अधिकारी अनिल कुमार बस्ते, डॉ.जी.ए. गायकवाड, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासिका डॉ. धम्मसंगिनी रमागोरख, डॉ. विनायक मुंडे, प्रा. डॉ. रत्नदीप सोनकांबळे, आंबेडकरी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर डॉ. अशोक धबाले, डॉ. दिलीप फुगारे, डॉ. एस आर लोणीकर, डॉ. अनंत सूर्यवंशी, डॉ. विद्याधर केळकर, डॉ. अनिल देगावकर,डॉ. रमेश बनसोडे डॉ. उत्तम मोरे, डॉ. दिलीप कंधारे, डॉ.विठ्ठल भुरके, डॉ.नितीन पाईकराव डॉ. धम्मपाल कदम, डॉ. श्याम दवणे, डॉ. उत्तमराव इंगोले, डॉ. प्रशांत गजभारे,डॉ. ईरवंत पल्लेवाड, डॉ. त्रिशला धबाले, डॉ. स्मिता पाईकराव, डॉ. वंदना कंधारे, डॉ. प्रीती कदम,डॉ. कांचन धुळे, डॉ. शितल सोनकांबळे, डॉ. सुधीरकुमार कांबळे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
श्रमिक आणि कष्टकऱ्यांसाठी आपले आयुष्य अर्पण करणारे श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांना यावर्षीचा बोधी जीवनगौरव पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेल्या पेटलेली माणसे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे.
सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरची पदवी संपादन करणारे डॉ. सिद्धार्थ सोनकांबळे यांचा आंबेडकरवादी मिशनच्यावतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन देगलूरचे माजी नगरसेवक वाय. जी. सोनकांबळे, इंजि.एम बी मोडक (मुंबई) यांच्यासह बोधी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.