दोन अल्पवयीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी)- दोन अल्पवयीन बालके पाण्याच्या खड्यात पोहण्यासाठी गेली असतांना बुडून मरण पावल्याचा दुर्देवी प्रकार देगलूरजवळ शेतात घडला आहे.
रोहिदास भुजंगराव राजुरे रा.कावळगडा ता.देगलूर यांनी दिलेल्या खबरीनुसार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दिलीप पाटील यांच्या शेताजवळील धुऱ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या खड्‌ड्यातील पाण्यात अक्षय रोहिदास राजुरे (10) आणि प्रमोद हणमंत राजुरे (11) दोघे. रा.कावळगडा हे पोहण्यासाठी गेले. पण पाण्याचा अंदाज अयोग्य ठरला आणि या दोन्ही अल्पवयीन बालकांचा त्यात बुडून मृत्यू झाला. देगलूर पोलीसांनी हा प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार केंद्रे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *