जीएसटी कराचा मोठा घोळ या बायोडिझेल प्रकरणात उघड?
नांदेड(प्रतिनिधी)-बनावट जीएसटी क्रमांकावर बायोडिझेल खरेदी करण्याची परवानगी नसतांना तो जीएसटी क्रमांक वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बायोडिझेल प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 420 वाढविण्यात आले. याप्ररकणी औरंगाबाद येथील शेख कादर अली अफजल अलीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.19 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार दिपक पार्श्र्वनाथ मरळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1200 लिटर बायोडिझेल प्रकरणी छोटा हत्ती नावाचे वाहन पकडण्यात आले. त्यामध्ये असलेले बायोडिझेल हे बिना परवाना होते म्हणून ते वाहन क्रमांक एम.एच.38 ई 1438 चा चालक मुत्तहार खान यास अटक झाली. त्याची अगोदर पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी अशी रवानगी झाली. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्याकडे आहे.
बायोडिझेल प्रकरण अत्यावश्यक अधिनियम 1995 च्या कलम 3 आणि 7 नुसार दाखल झाले होते. पकडलेल्या छोट्या हत्ती वाहनात एक ईबील सापडले होते. त्या ईबिलावर मुंबई येथील जीएसटी क्रमांक 27AAFCH8854F1ZA नुसार औरंगाबाद येथील जीएसटी क्रमांक 27BQYPS2975K1ZM यावर हे बायोडिझेल पाठविण्यात आले होते. या संदर्भाने पोलीसांनी सहआयुक्त वस्तु व सेवा कर औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता औरंगाबाद येथील जीएसटी क्रमांक बाळगणाऱ्या व्यक्तीकडे बायोडिझेल खरेदी करण्याचा परवानाच नाही म्हणून औरंगाबाद येथील जीएसटी क्रमांक ज्याच्या नावे आहे. तो व्यक्ती शेख कादर अली शेख अफजल अली (36) रा.न्यु नंदनवन कॉलनी औरंगाबाद यास नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 26 नोव्हेंबर रोजी अटक केली.
आज 27 नोव्हेंबर रोजी पकडलेल्या शेख कादर अलीकडून या जीएसटी क्रमांकावर किती मोठा व्यवहार झाला आहे याची माहिती घेणे आहे. या खात्यानुसार खरेदी झालेले बायोडिझेलची रोख रक्कम मुंबई येथील कोणत्या व्यक्तीच्या नावावर दिली आहे हे तपासणे आहे. या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असू शकते याचा तपास करायचा आहे. असे पोलीसांनी आपल्या कागदपत्रात लिहिले आहे. सरकारी वकील ऍड. ए.एम. सौदागर यांनी शेख कादर अलीला पाच दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्या.एम.बी.कुलकर्णी यांनी शेख कादर अलीला तीन दिवस अर्थात 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.