नामांतर शहीद गौतम वाघमारे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

नांदेड (प्रतिनिधी)-मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लढणारे लढवय्य पँथर शहीद गौतम वाघमार यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त दि. २५ नोव्हेंबर रोजी जयभीमनगर येथील त्यांच्या स्मारकाजवळ सकाळी दहा वाजता अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

सर्वप्रथम आदर्शाची पूजा करुन त्रिशरण पंचशील घेण्यात आले. शहीद स्मारक येथे आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्यावतीने २८ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनाळे व सुभाष काटकांबळे यांनी शहीद गौतम वाघमारे यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थितांच्यावतीने शहीद गौतम वाघमारे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रफुल्लदादा सावंत, ॲड. एम. जी. बादलगावकर, नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर, ज्येष्ठ नेते भाऊराव भदरगे, कवि मोहन नौबते, शशिकांत वाघमारे, गौतम वाघमारे, प्रमोद गजभारे, अतिश ढगे, रविंद्र नरवाडे, हर्षवर्धन ढवळे, चेतन भुजबळ, भगवान भालेराव यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.. शेवटी शहीद गौतम वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *