नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन दुचाकी गाड्या एका चोरट्याकडून जप्त केल्या असून एक टॅक्टर हेड जप्त केले आहे. एकूण 5 लाख 80 हजार रुपये किंमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तर 4 लाख रुपये चोरीच्या ऐवजाची जप्ती करण्याची प्रक्रिया आखाडा बाळापूर पोलीस करणार आहेत.
पोलीस जनसंपर्क विभाग नांदेडच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार बालाजी कदम, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, शेख इम्रान आणि व्यंकट गंगुलवार हे 25 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे गस्त करत असतांना त्यांनी सुधिर तातेराव तरटे रा.वडगाव पोस्ट पांचाळ जवळा ता.कळमनुरी जि.हिंगोली यास ताब्यात घेवून विचारणा केली असता भाग्यनगर पोलीस ठाण्यातील एका चोरी प्रकरणात त्यांनी चोरलेल्या 80 हजार रुपये किंमतीच्या दोन गाड्या पोलीसांना दिल्या आहेत.
दुसरा एक व्यक्ती तुकाराम उर्फ बबलू लक्ष्मण पवार रा.चिंचोरडी ता.कळमनुरी जि.हिंगोली यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने दिपक उर्फ छक्या विनोद भोकरे रा.जुना कौठा नांदेड, सुधीर तातेराव तरटे रा.वडगाव आणि इतर एक अशा सर्वांनी मिळून पोलीस ठाणे आखाडा बाळापूर आणि पोलीस ठाणे कुरूंदा यांच्या हद्दीतून दोन ट्रॅक्टर हेड चोरल्याची कबुली दिली. त्यातील एक ट्रॅक्टर हेड पाच लाख रुपये किंमतीचे चोरट्याने सांगितल्याप्रमाणे रिसोड येथून जप्त करण्यात आले आहे. दुसरे ट्रॅक्टर हेड जप्त करण्याची प्रक्रिया आखाडा बाळापूर पोलीस करणार आहेत. वजिराबाद पोलीसांच्या या कामगिरीसाठी प्रभारी पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने चोरीचे एक ट्रॅक्टर हेड आणि दोन दुचाकी जप्त केल्या