नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करून उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. तेंव्हा मुक्रामाबाद पोलीसांनी आपल्या पत्नीला मारून टाकणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची तक्रार मारेकऱ्याच्या मुलानेच दिली आहे.
तानाजी हरिश्चंद्र राठोड रा.निमजगा तांडा ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची आई जिजाबाई (55) यांना त्याचे वडील हरिश्चंद्र राठोड यांनी 20 नोव्हेंबर रोजी पहाट होण्याअगोदर 4 वाजता जिवे मारण्याच्या उद्देशाने कत्तीने तोंडावर, पोटावर मारून जखमी केले. उपचारादरम्यान जिजाबाई हरिश्चंद्र राठोड यांचा सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे मृत्यू झाला. मुक्रामाबाद पोलीसांनी या प्रकरणी हरिश्चंद्र राठोड विरुध्द गुन्हा क्रमांक 525/2021 कलम 302 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गोपिनाथ वाघमारे हे करीत आहेत.
वडीलाने आईचा खून केला पुत्राची तक्रार