नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित महसुल आयुक्तालय येथे 1 ते 2 लाख रुपयांची चोरी झाली असून चार ते पाच लाख रुपये शासकीय मालमत्तेचे नुकसान पण झाले आहे. उमरी येथे 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोयाबिन चोरीला गेले आहे. तसेच आंबाळा फाटा ता.हदगाव येथून अख्खा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्ह्यात बदली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडीडीएस कार्यालयासमोर असलेल्या नियोजित महसुल आयुक्त इमारतीमध्ये दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री चोरट्यांनी घुसून तेथे चार ते पाच लाख रुपये किंमतीच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आणि 1 ते 2 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. याबाबतची तक्रार मंडळाधिकारी कोंडिबा माधवराव नागरवाड यांनी दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी यांच्याकडे तपास दिला आहे.
गोविंद लक्ष्मणराव कळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मामा चौक उमरी येथे त्यांच्या भुसार गोडाऊनचे शटर वाकवून दि.27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतरच्या 1 ते 3 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी 55 ते 60 सोयाबीनचे पोते किंमत 1 लाख 60 हजार रुपयांचे चोरून नेले आहेत. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शेवाळे करीत आहेत.
शेख जफर शेख गफार याने आपला 14 टायरचा ट्रक क्रमांक एम.एच.12 एन.एक्स.4859 बिघडल्यामुळे मौजे आंबाळा फाटा ता.हदगाव येथे 22 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजता उभा केला तो ट्रक दुरूस्तीसाठी मेकॅनिक आणायला गेला आणि 6 वाजता परत आला तोपर्यंतच अख्खा 14 टायरचा ट्रक, 4 लाख 70 हजार रुपये किंमतीचा कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला होता.शेख गफरने ही तक्रार न्यायालयात दाखल केली. त्यानंतर आता हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक मोरे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित महसुल आयुक्तालयात चोरी