
नांदेड(प्रतिनिधी)-गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार आणि दोन पोलीस अंमलदार आज आपल्या विहित वयानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पुढील जीवनासाठी शुभकामना दिल्या.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक काझी अजगर अली आबेदीन(पोलीस मुख्यालय) आणि चालक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख अमानुल्ला शेख मुनवर (मोटार परिवहन विभाग) यांनी आपल्या जीवनातील पोलीस विभागाचा विहित कालावधी पुर्ण केल्यानंतर आज सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्याहस्ते विकास तोटावार आणि दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक काझी आणि शेख अमानुल्ला यांना शाल श्रीफळ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी त्यांना शुभकामना देतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या अडचणींसाठी नांदेड जिल्हा पोलीस दल सदैव तयार राहील असे सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे हे उपस्थित होते. पोलीस कल्याण विभागाच्या महिला पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.