
नांदेड(प्रतिनिधी)-गुंडा तालुका वसमत शिवारात पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात हट्टा पोलीसांनी हळदीच्या शेतात उगवलेली 143 गाजांची झाडे पकडली आहेत. या गांजाची किंमत 6 लाख 69 हजार रुपये आहे.
हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, वसमतचे पोलीस उपअधिक्षक किशोर कांबळै, हल्लाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे, पोलीस उपनिरिक्षक पठाण, पोलीस अंमलदार अरविंद गजभारे, राजाराम कदम, गणेश लेकुळे, सुमेश कांबळे, मदार शेख, वाघ, वळसे आणि चव्हाण यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर गुंडा ता.वसमत शिवारात एका हळदीच्या शेतात छापा मारला. या छाप्यात एकूण 143 गांजाची झाडे सापडली. या झाडांचे एकूण वजन 76.69 किलो आहे. या गांजाच्या झाडांची किंमत 6 लाख 69 हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीसांनी शेत मालकाला उत्तम मारोतराव भालेराव (55) रा.गुंडा ता.वसमत यास ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी हिंगोली पोलीस अधिक्षक राकेश कलासागर आणि त्यांच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
