नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सर्व नागरीकांनी दुकानात आणि आपल्या व्यक्तीगत घरात डस्टबीन (कचऱ्याचा डब्बा) वापरणे बंधनकार करण्यात आले आहे. तसेच धाऊक आणि ठोक कचरा निर्माते श्रेणीतील व्यावसायीकांनी निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करावे अशी अपेक्षा महानगरपालिकेने केली आहे. महानगरपालिकेतील स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) कक्षाच्या वतीने याबाबत प्रसिध्दी पत्रकार पाठविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सन 2016 च्या घनकचरा व्यवस्थापन अधिसुचनेचा संदर्भ देवून नागरीकांनी विघटनशिल आणि अविघटनशिल असा सुका आणि ओला कचरा वेगवेगळा आपल्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये साठविण्यासाठी डस्टबिनचा वापर करावा अशी अपेक्षा केली आहे. तो कचरा नेमून दिलेल्या एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. शहरातील मुख्य रस्ते दोन वेळा झाडलोट केली जाते. पण नागरीक घरातील आणि दुकानातील कचरा रस्त्यावर आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर टाकल्याचे दिसत आहे. आता या लोकांवर दंडात्मक कार्यवाही होणार आहे. रस्त्यांवर कचरा टाकल्यास 150 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आपल्या दुकानात येणाऱ्या लोकांना सुध्दा आपल्या दुकानात डस्टबिन ठेवला आहे याची जाणीव करून द्यावी आणि संकलीत केलेला कचरा घंटा गाडीकडे द्यावा असे नगरपालिकेने प्रसिध्दी पत्रकार म्हटले आहे.
ज्या व्यवसायीकांकडे जसे मंगल कार्यालय, सभागृह, समाजमंदिर, लघुउद्योग, गृहउद्योग यांचे चालक आणि मालक आणि संस्था यांनाही असा ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत तयार करावे असे नगरपालिकेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. या कामासाठी महानगरपालिकेचे स्वच्छता निरिक्षक मार्गदर्शन आणि सहकार्य करतील त्याचा उपयोग घेवून नांदेड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात प्रत्येक नागरीकाने आपला हातभार लावावा अशी महानगरपालिकेची अपेक्षा आहे.
ओला कचरा आणि सुका कचरा रस्त्यावर टाकू नका नाहीतर दंड भरावा लागेल