गणेशनगर भागातील उच्चभ्रूवस्तीत भगवान मारोती आणि भगवान श्रीराम यांच्या साक्षीने 52 पत्त्यांचा जुगार अड्डा सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गणेशनगर भागात श्री मारोतीरायाच्या पाठीमागे आणि मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या समक्ष एका उच्चभ्रू वस्तीमध्ये 52 पत्यांचा जुगार अड्डा सुरू करण्यात आला आहे. नांदेडच्या कांही जुगाऱ्यांनी परळी येथील महादेवाच्या साक्षीने आपला जुगार अड्डा तेथे सुरू केला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेडचे पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर बऱ्याच जुगाऱ्यांना पोलीसांनी नवीन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. तरीपण नांदेडच्या गणेशनगर भागात एका उच्चभु्र वस्तीमध्ये बलवान श्री मारोतीराया यांच्या पाठीमागे आणि मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या समक्ष एक जुगार अड्डा चालू झाला आहे. या जुगार अड्यात जुगार खेळणाऱ्यांसाठी भरपूर मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जुगार अड्‌ड्याकडे जाणाऱ्यांची ओढ जास्त आहे. या जुगार अड्‌ड्याचे चालक आणि त्यांचे भागिदार असे समजतात की, आमचा जुगार अड्डा कोणीच बंद करू शक त नाही आणि याच भ्रांतीमध्ये हा जुगार अड्डा आजही सर्रास सुरू आहे.
नांदेडच्या कांही जुगाऱ्यांनी गोदाकाठ सोडून परळी महादेवाच्या आशिर्वादाने आपला जुगार अड्डा तेथे सुरू केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या ठिकाणी तर मुंबई सारख्या महानगरातील पध्दतीप्रमाणे जुगार खेळण्याची संधी जुगाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे अगोदर पैसे देवून प्लॅस्टीक कॉईन घ्यावे लागतात. त्यावर खेळ सुरू होतो आणि खेळ संपल्यावर त्या प्लॅस्टीक कॉईनचे पैसे मिळतात. अशा पध्दतीने जुगार बंद आहे असे दाखवले जात असले तरी जुगार मात्र सर्वत्र सुरू आहे. महाभारताच्या काळापासून जुगाराला जास्त महत्वप्राप्त झाले ते आज 5 हजार वर्षानंतर सुध्दा ते महत्व कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *