किर्ती कन्सलटंसी ऍन्ड प्रोपर्टी ब्रोकर्स हा पण धंदा
नांदेड(प्रतिनिधी)-बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचे पवन बोरा यांचे किर्ती कन्सलटंसी ऍन्ड प्रोपर्टी ब्रोकर्स नावाची पण एक संस्था आहे. त्यानुसार त्यांनी बांधकाम व्यवसायीक प्रथमेश महाजन सोबत करोडो रुपयांचा करार केल्याची एक नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे.
नांदेड येथील बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचे तथाकथीत महाराष्ट्र अध्यक्ष हे या बोगस समितीचे संस्थापक, महाराष्ट्र भूषण शेख जाकीर शेख सगीर सोबत काम करत होते. 3 नोव्हेंबर रोजी फटका व्यापारी धनराज मंत्री यांना दिलेल्या धमकीसाठी त्यांच्यासह तिघांविरुध्द जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या प्रकरणात तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी पवन जगदीश बोरा (शर्मा) यास अटक केली. सध्या तो तुरूंगात आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने अटकपुर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेशात नियुक्त केलेले सर्व पदाधिकारी रद्द केल्याचे एक पत्र राज्यपालांना पाठवले तरी पण शहरातील एका इमारतीवर आजही दि.05 डिसेंबर 2021 रोजी सुध्दा या बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचा बोर्ड लावलेला दिसत आहे. त्यावर प्रदेश कार्यालय असे लिहिले आहे. कांही दिवसापुर्वीच या बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचे लेटर पॅड बदलण्यात आले आहे.
दरम्यान प्रथमेश विजय महाजन या बांधकाम व्यवसायीकासोबत झालेला एक वचनपुर्ती करारनामा प्राप्त झाला. त्यावर किर्ती कन्सलटंसी ऍन्ड प्रोपर्टी ब्रोकर्स असे लिहिले आहे. त्याचे मालक पवन बोरा (शर्मा) असे आहे. यावर पेनने नोंदणी क्रमांक लिहिलेला आहे. तो 1741600311466188 असा आहे. पण ही नोंदणी कोणत्या कार्यालयाची आहे. याबाबत काही उल्लेख नाही. वचनपुर्ती करारनाम्यामध्ये लिहुन देणार प्रथमेश विजय महाजन आहेत आणि लिहुन घेणार पवन जगदीश बोरा हा व्यक्ती आहे. याचा धंदा प्रोपर्टी ब्रोकर्स असा लिहिला आहे. बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती हा धंदा आहे की, प्रोपर्टी ब्रोकर्स हा धंदा आहे हे एक नवीन व्टिस्ट समोर आले आहे. बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या बदलेल्या लेटर पॅडवर सुध्दा हाच नवीन पत्ता लिहिलेला आहे. तेथे कार्यालय मात्र दिसत नाही. करारनाम्यामध्ये समन्वयक व ब्रोकर म्हणून काम करणार आहेत. इंग्लीश डिक्शनरीमध्ये ब्रोकर या शब्दाचा अर्थ दलाल असा दाखवला जातो.
या करारनाम्यामध्ये ज्या संपत्तीचा उल्लेख आहे. ती संपत्ती सांगवी परिसरातील असून मालकाचे नाव नयर जहॉं बेगम हाजी खान कौठा ता.नांदेड असे आहे. त्याचा गट क्रमांक 258 आहे. ही जमीन गाव नमुना क्रमांक 7/12 मध्ये 27 गुंठे लिहिलेली आहे. या जमीन मालकासोबत बोलून प्रथमेश महाजनचे काम करण्यासाठी पवन बोराला 1 टक्के कमीशन अर्थात दलाली मिळणार आहे. ती 1 टक्के कमीशन 9 कोटी 49 लाख 26 हजार रुपये होते. हा करार 19 सप्टेंबर 2020 रोजी किर्ती कन्सलटंसी ऍन्ड प्रोपर्टी ब्रोकर्स या ऑफीसमध्ये झाला आहे.जमीन मालकास सुध्दा 27 गुंठे जमीनीचे 9 कोटी 49 लाख 26 हजार द्यायचे आहेत आणि पवन बोराला सुध्दा 1 टक्का कमीशनमध्ये 9 कोटी 49 लाख 26 हजार रुपये देणे प्रथमेश महाजनवर बंधनकारक आहे असे या करार पत्रकात नमुद आहे. 3 हजार 651 रुपये चौरसफुट प्रमाणे ही 27 गुंठे जमीन खरेदी करीत असल्याचा शाब्दीक व्यवहार व करार केला आहे असे यात लिहिले आहे. हा करारनामा 30 सप्टेंबर 2020 रोजी तयार झाला आहे आणि 3 महिने अर्थात 18 डिसेंबर 2020 या काळात व वेळेत पुर्ण करण्याचे ठरले आहे असे या करारपत्रात लिहिले आहे.
पवन बोरोच्या अनेक अर्जांमध्ये त्याचा धंदा माहिती अधिकार संरक्षण समिती असा लिहिलेला आहे. आणि आता नवीन धंदा समोर आला आहे तो किर्ती कन्सलटंसी ऍन्ड प्रोपर्टी ब्रोकर्स या नावाचा आहे. सध्या तर तो तुरूंगात वास्तव्याला आहे. या कराराच्या कार्यान्वये झाले की, नाही याबाबत माहिती प्राप्त झाली नाही आणि झाले असेल तर मग मात्र पवन बोरा हा माणुस करोडोपती असल्याचे या करारानुसार वाटते. खरे देवालाच माहिती.
पवन बोराचा नवीन धंदा समोर आला