नांदेडच्या जुगाऱ्यांनी पालम-गंगाखेड भागात थाटला नवीन जुगार अड्डा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 52 पत्यांच्या जुगार चालकांनी आपले बस्तान पालम-गंगाखेड जि.परभणी येथे मांडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परभणीचे पोलीस अधिक्षक जयंत मिणा आहेत. जयंत या नावातच विजय आहे आणि त्यांची ख्याती जशी आहे त्याप्रमाणे जुगार अड्डे या भागात चालत असतील तर हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे.
नांदेड येथील 52 पत्यांच्या जुगार चालकांनी आपले बस्तान शहरातील अनेक भागात बसवले होते. पण पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ते उधळून लावले. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आपले बस्तान या जुगाऱ्यांनी थाटल्यानंतर त्या जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांनी त्यांचा नवीन डाव उघडा पाडला. त्यानंतर मात्र आता या जुगाऱ्यांनी नवीन जिल्हा शोधला असून तो परभणी आहे. त्यातील गंगाखेड-पालम या भागात या जुगाऱ्यांनी आपले दुकान थाटले आहे. नांदेड येथून वातानुकूलीत गाड्यांमध्ये जुगारी तेथे नेले जातात आपला सर्व ऐवज तेथे स्वाहा करतात  आणि पैसे गमावलेल्या जुगाऱ्यांना परत वातानूकुलीत गाड्यांमध्ये नांदेडला आणून सुखरूप त्यांच्या घरी सोडले जाते आणि उद्या पुन्हा जिंकण्याच्या आशेने नवीन पैसे घेवून जुगार अड्यावर जावे आणि आपले सर्व पैसे त्यांना देवून परत यावे.
नांदेड जिल्ह्यातील या जुगाऱ्यांना आपसात भांडणे लावून आपल्या भाकरीवर तुप ओढण्याची ही जुनीच सवय आहे. त्यातून एकाच कुटूंबातील लोकांमध्ये वितुष्ट तयार होते पण त्यांचे घर भरले जाते. आपले घर भरण्यासाठी या जुगाऱ्यांची ही कृती मानसिक विकृतीचा प्रकार आहे. पण जुगार चालविण्याची घाणेरडी सवय पडलेल्या या जुगाऱ्यांना गप्प बसणे होत नाही. परभणीचे पोलीस अधिक्षक जयंत मिणा यांच्या नावाचा विजयी होणारा असा होतो. त्यांना जेंव्हा या सर्व घटनाक्रमाची माहिती मिळेल तर नक्कीच ते सर्व कांही पाहुन घेतील.
पर्यायी व्यवस्था नांदेड येथील गणेशनगर भागात
जी मंडळी पालम पर्यंत जाण्यास तयार नाही त्यांसाठी नांदेड शहरातील गणेशनगर भागात सुध्दा एक जुगार अड्डा या जुगाऱ्यांनी आता आपल्या हातात घेतला आहे. गणेशनगर हा भाग शिवाजीनगर पोलीसांच्या हद्दीत येतो. त्या ठिकाणी सध्या भगवान धबडगे हे पोलीस निरिक्षक आहेत. त्यांच्या नावातच भगवान असल्याने त्यांना सर्व कांही कळेलच आणि त्यांना कळेल तेंव्हा ते या जुगाऱ्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *