एकूण चार चोऱ्या; 7 लाख 56 हजार 500 रुपयंाचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-सारथीनगर तरोडा (बु) येथे एक घरफोडून चोरट्यांनी सव्वा सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तामसा येथे एक दुकान फोडून त्यातील 69 हजार 500 रुपयांचा साहित्य चोरून नेले आहे. लोहा येथे एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून चोरट्यांनी 32 हजारांचा ऐवज लंपसा केला आहे. नांदेड शहरातील विजयनगर भागातून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. या सर्व चार चोरी प्रकारांमध्ये 7 लाख 56 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
शिव रोड, राज सार्थीनगर तरोडा (बु) येथील संजय शंकरराव आळणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 डिसेंबर रोजी ते आपल्या सर्व कुटूंबासह लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी अमरावती येथे गेले होते. 4 डिसेंबर रोजी परत आले तेंव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते आणि आतील कपाट फोडून त्यात ठेवलेले 125 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, किंमत 6 लाख 25 हजार रुपयांचे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.कांबळे अधिक तपास करीत आहेत.
तामसा येथील निलेश विजयकुमार काला यांच्या तक्रारीनुसार तामसा भोकर रस्त्यावर निलेश ट्रेडींग कंपनी आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ही दुकान बंद झाली आणि 5 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजता त्यांना दुकानाचे शटर वाकवल्याची माहिती मिळाली. तपासणी केली असता त्यातील 69 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. तामसा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कल्याणकर अधिक तपास करीत आहेत.
लोहा येथील किशन धोंडीराम सावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड-लातूर रस्त्यावर त्यांचे एसबीआय ग्राहक सेवा केंद्र आहे. 4-5 डिसेंबरच्या रात्री या दुकानाचे शटर कोणी तरी अर्धवट उघडून त्यातून 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक संतोष तांबे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील विजयनगर भागातून गणेश कैलास सोनटक्के या विद्यार्थ्याची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एल.8269 दि.3-4 नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिलराज ढवळे अधिक तपास करीत आहेत.
6 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरले