तामसा जवळील टाकरस शिवारात एकाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वत: फाशी घेतली

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा जवळी टाकरस शिवारात जंगलात आपली पत्नी आणि आपला मुलगा यांची हत्या करून एकाने स्वत: फाशी घेतली आहे. आज या घटनेची माहिती समोर आली. त्या ठिकाणी दिसणाऱ्या परिस्थितीनुसार हा सर्व प्रकार 8 ते 10 दिवसांअगोदर घडलेला असेल.
आज जिल्ह्यातील सर्व पोलीस दल 6 डिसेंबरच्या विविध कार्यक्रमांमुळे व्यस्थ असतांना आजचा दिवस उजाडताच सकाळी कोणी तरी टाकरस शिवारातील जंगलात एक महिला आणि एका बालकाचा मृत्यदेह खाली पडलेला आहे आणि एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने जंगलातील झाडाला फाशी घेतलेली आहे. असे तीन मृतदेह पाहिले. घटना पाहणाऱ्या माणसाने त्वरीत ही माहिती तामसा पोलीसांना दिली.
तामसाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ए.एन.उजगरे यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस उपअधिक्षक गोपाळ रांजणकर,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांचे सहकारी, हिमायतनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक महाजन, तामसाचे पोलीस अंमलदार एस.पी.राठोड, राजेश गुंडेवाड, सिंगरवाड, एस.के.राठोड, ज्ञानेश्र्वर टिमके, सुनिल सुर्यवंशी, ज्ञानेश्र्वर जिंकलवाड आदी घटनास्थळी पोहचले. तेथे दिसणाऱ्या परिस्थितीनुसार रक्ताने माकलेले कांही दगड येथे सापडले आहेत. मयत महिलेचे नाव सिमा शांतामन कावळे(40), सुजित शांतामन कावळे (17) असे आहेत. या दोघांना दगडाच्या सहाय्याने ठेचून मारले असावे असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. या मृतदेहांच्या शेजारीच असलेल्या झाडांना शांतामन सोमा कावळे (45) याने दोरीच्या सहाय्याने स्वत:ला फाशी लावून घेतली आहे. ही सर्व मंडळी टेंभी ता.हिमायतनगर येथील रहिवासी आहेत.मृतदेह पुर्णपणे कुजलेले आहेत. करणाऱ्यांच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली आहे. प्राथमिक दृष्ट्या शांतामन कावळेने आपली पत्नी सिमा आणि मुलगा सुजित या दोघांचा दगडाने ठेचून खून केला असेल आणि स्वत: नंतर फाशी लावून घेतली असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. कावळे कुटूंबियातील एक 18 वर्षीय मुलगा अभिजित हा अद्याप बेपत्ता असल्याने तो कोठे आहे हे शोधणे महत्वपुर्ण आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत अभिजित कुटूंबासोबतच होता याची माहिती प्राप्त होत आहे पण त्यानंतर तो कुठे गायब झाला हे अद्याप समजले नाही. हा सर्व प्रकार टाकराळा शिवारातील वन खात्याच्या जमीनीत घडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *