नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिके तील प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीत आज शेवटच्या दिवशी आठ अर्ज दाखल झाले आहेत. या आठ अर्जांमध्ये चार कॉंगे्रस पक्षाचे आहेत. दोन भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि दोन एमआयएमचे आहेत. हा प्रभाग अनुसूचित जाती महिलासाठीचा राखीव प्रभाग आहे.
महानगरपालिका निवडणुक निर्णय अधिकार्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार आज महानगरपालिका नांदेडच्या प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीत एकूण आठ उमदेवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात कॉंगे्रस पक्षाच्यावतीने चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रिती रामचंद्र जोंधळे, रेखा उत्तम महामुने, रजिया बेगम आयुब खान आणि मुस्कान नाज सय्यद वाजीद यांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिनाबाई राजू जोंधळे आणि लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे यांनी अर्ज भरले आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन, एमआयएमच्यावतीने उज्वला शेषेराव दिपके आणि रेशमा बेगम सलीम बेग यांनी आपले अर्ज भरले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे.