


नांदेड(प्रतिनिधी)-आज ६ डिसेंबर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ज्ञानाच्या अथांग महासागराला भारतीय नागरीकांनी तसेच त्यांच्या अनुयांनी अभिवादन करून आपले श्रध्दा सुमन अर्पित केले.
आज ६ डिसेंबर हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आज सकाळपासूनच शहरातील आणि जिल्ह्यातील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी कोविड नियमावली पाळून अभिवादन करत होते. सर्वच पक्षीय नेते मंडळींनी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. सर्व शासकीय कार्यालयातमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून महापरिनिर्वादिन पुर्ण करण्यात आला. अनेक सामाजिक संस्था आणि खाजगी व्यक्तींनी विविध कार्यक्रम आखले होते. ज्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान, गरजूंना मदत अशा अनेक कार्यक्रमांचा या दिवसात समावेश करण्यात आला होता.
सायंकाळी अनेक बौध्द अनुयायांनी कोरोना नियमावलीच्या आधारे कॅन्डल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पोहचून त्यांना अभिवादन करण्यात आले. ज्ञानाच्या या अथांग महासागराला आजचे अभिवादन पाहिले असता त्यांची या जगातील उच्चस्थिती लक्षात येते.
