नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील ईस्लापूर आणि बिलोली या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या झाल्या आहेत. शहरातील शिवाजीनगर भागातून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. माहुर येथून 1 दुचाकी चोरीला गेली आहे. लाडका शिवार ता.कंधार येथून एक बैल चोरीला गेला आहे. तसेच भोकरच्या स्मशानभूमीसमोरून एका ट्रकमधून डिझेल चोरी करतांना एका चोरट्याला पकडण्यात आले आहे.
कुपटी ता.किनवट येथील गंगाबाई देवजी कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री कांही जणांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत 15 हजार रुपयांची आणि डब्यात ठेवलेले 5 हजार रुपये रोख रक्कम असा 20 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. ईस्लापूर पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बोधगिरे अधिक तपास करीत आहेत.
अतुल अशोक राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास सावळी रोडजवळील पुलाजवळ त्यांनी आपले काम संपल्यानंतर जेसीबीवर झोपले असतांना कांही दरोडेखोरांनी त्यांच्या खिशातील 15 रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दि.5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता गजानन रामकिशन इरलेवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एच.0737 ही गाडी नागार्जुना हॉटेलसमोरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 35 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार केंद्रे हे करीत आहेत.
श्रावस्तीनगर येथून राहुल दिगंबर जमदाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही.3559 ही 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
माहुर येथील मेटेकर यांच्या वाड्यातून विजय मारोतराव पतंगे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.5097 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 1-2 डिसेंबर रात्री चोरीला गेली आहे. माहुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार आडे अधिक तपास करत आहेत.
लाडका शिवार ता.कंधार येथून 3-4 डिसेंबरच्या रात्री विशाल माधवराव शिंदे यांच्या शेताच्या आखाड्यावरील बांधलेला 40 हजार रुपये किंमतीचा बैल कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुंडे अधिक तपास करीत आहेत.
शेख मुख्तार शेख मौला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 डिसेंबरच्या सायंकाळी 7 ते 6 डिसेंबरच्या सकाळी 6.30 वाजेदरम्यान त्यांनी आपला ट्रक क्रमांक टी.एस.08 यु.डी.2399 स्मशानभुमीसमोर भोकर येथे उभा केला होता. त्यांनी एका माणसाला डिझेल टाकी उघडून त्यातून डिझेल चोरतांना पकडले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
दोन जबरी चोऱ्या; तीन दुचाकी चोऱ्या, ट्रकमधून डिझेल चोरी