एकूण 150 उमेदवारी अर्ज सर्वाधीक अर्ज कॉंगे्रस पक्षाचे
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 150 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. ही नगर पंचायत कॉंगे्रसचा प्रभाव असलेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या नावावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शेख जाकीर शेख सगीरने आपला अर्ज भरलेला आहे. या प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसने बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती चालवलेल्या व्यक्तीला बी फॉर्म देणार काय हा मुद्दा काही तासात क्लिअर होणार आहे.
अर्धापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे आहेत.प्रभाग 01 -06, प्रभाग 02-07, प्रभाग 03-11, प्रभाग 04-05, प्रभाग 05-05, प्रभाग 06-07,प्रभाग 07-06,प्रभाग 08-04,प्रभाग 09-07,प्रभाग 10-15,प्रभाग 11-04,प्रभाग 12-11,प्रभाग 13-16,प्रभाग 14-10,प्रभाग 15-19 , प्रभाग 19-09,प्रभाग 17-08 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जामध्ये एकूण उमेदवारांच्या भागाकारानुसार कॉंगेस पार्टीच्या नावावर 41 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नावावर 23 जणांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्यावतीने फक्त 8 प्रभागांमध्ये पक्षांच्या नावावर उमेदवारी भरण्यात आली आहे. याशिवाय बहुजन समाज पार्टी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे एकूण 150 उमेदवार रिंगणात आज आहेत. यानंतर अर्ज छाननी, अर्ज परत घेणे आणि त्यानंतर अंतिम यादी तयार होते. पुढे आता ही रेस लागणार आहे की, कोणत्या पक्षाचा बी फॉर्म कोणाला मिळेल. त्यानंतर तो उमेदवार त्याप्रभागासाठी संबंधीत पक्षाकडून सुनिश्चित होईल.
अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये 23 वर्ष 6 महिने वयाचा सर्वात लहान उमेदवार आहे. वयाने मोठे असलेल्यांमध्ये प्रभांग क्रमांक 16 मध्ये 78 वर्ष 9 महिने वयाच्या महिला उमेदवार आहेत. प्रभांग क्रमांक 12 मध्ये 78 वर्ष 9 महिने वयाचे उमेदवार आहेत. प्रभांग क्रमांक 7 मध्ये 71 वर्ष 8 महिने वयाचे उमेदवार आहेत. प्रभांग क्रमांक 15 मध्ये 70 वर्ष 11 महिने वयाचे दोन उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 69 वर्षीय उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातच नव्हे राज्यात मागील एक दशक माहिती अधिकारी संरक्षण समिती या नावावर मोठ-मोठे कारनामे करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावावर आपला अर्ज भरला आहे. शेख जाकीर शेख सगीरविरुध्द नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 422 विनयभंग सदराखाली नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने नगर पंचायत निवडणुकीत 8 प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याचे ठरविले तर प्रभाग क्रमांक 3 मधून शेख जाकीर शेख सगीरशिवाय दुसरा उमेदवार त्यांच्याकडे नाही. राष्ट्रवादी कॉंगे्रसची नेते मंडळी या विनयभंगातील आरोपीचा प्रचार आपला उमेदवार म्हणून कसे करतील हा प्रश्न निवडणुक प्रचार सुरू झाल्यावर लक्षात येईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावावर अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीत विनयभंगाच्या आरोपीने उमेदवारी अर्ज भरला