नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील वफ बोर्डाच्या मालकीची जमीन विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या एकूण 7 जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूकीतील रक्कम 34 लाख 75 हजार रुपये आहे.
प्रभारी जिल्हा वफ्फ अधिकारी मोहम्मद रियाजोद्दीन मोहम्मद गयासोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर येथील वफ्फ संस्था दर्गाह हजरत जियाउद्दीन रफाई रहे. या संस्थेकडे असलेली सर्व्हे नंबर 81 नवीन गट नंबर 291 ची मालमत्ता स्वत:ची आहे असे दाखवून वफ्फ मंडळाची कोणतीही परवानगी न घेता सय्यद जियाउद्दीन सय्यद खाजा मोहिनोद्दीन उर्फ नजीब साब या व्यक्तीने इतर सहा जणांना सौदाचिठ्ठी, ठराव पत्र, कोलनामा, खरेदीखत तयार करून ही जमीन 6 जणांना विक्री केली आहे. खरेदी करणाऱ्यांची नावे महेबुब हैदर साब, खैरुन्नीसा बेगम, रहेमत अली इनामदार, मिर्झा खुदरत बेगम, अहेमत बेग देशमुख, मिर्झा मुजाहिद बेग, खुदरत बेग देशमुख, मिर्झा इमराना बेगम खाजा बेग, अजमत बेगम खुदरत बेग देशमुख, मोहम्मद नाजीम मोहम्मद खासीम अशी आहेत. या सर्वांनी 34 लाख 75 हजार रुपयांचा अपहार केला आहे. वफ्फ बोर्डाची फसवणूक करून वफ्फ अधिनियम 1995 च्या कलम 52 (अ) चे उल्लंघन करण्यात आले आहे.
या तक्रारीनुसार देगलूर पोलीसांनी सय्यद जियाउद्दीन सय्यद खाजा मोहिनोद्दीन उर्फ नजीब साब याच्यासह इतर सहा अशा 7 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 556/2021, भारतीय दंड संहितेच्या कलम 465, 568, 471, 420 नुसार आणि वफ्फ अधिनियम सुधारीत 1995 च्या कलम 52(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.
वफ्फ बोर्डाची देगलूर येथील जमीन विक्री करणारा आणि खरेदी करणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल