लोहा सोनखेड रस्त्यावर 50 वर्षीय अनोळखी माणसाचा मृत्यू

सोनखेड पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले
नांदेड(प्रतिनिधी)-1 डिसेंबर रोजी लोहा -सोनखेड रस्त्यावरील मिल्ट्री कॅम्पजवळ एका 50 वर्षीय अनोळखी पुरूषाला कोणी तरी अज्ञात वाहनाने धडक दिली. जखमी अवस्थेतील हा अनोळखी व्यक्ती आज दि.8 डिसेंबर रोजी मरण पावला आहे. सोनखेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्याच्या नातलगांचा शोध घेण्यासाठी सोनखेड पोलीसांची मदत करावी.
सोनखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर रोजी लोहा-सोनखेड रस्त्यावरील मिल्ट्री कॅम्पजवळ एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीला कोणी तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला पोलीसांनी सरकारी रुग्णालय नांदेड येथे उपचारार्थ भरती केले होते. उपचारादरम्यान आज दि.8 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. हा अनोळखी व्यक्ती 50 वर्षाचा असून त्याच्या अंगावर मळकट रंगाचा ब्राऊन पॅन्ट आणि कंबरेला लाल करदोडा आहे. जनतेतील कोणी व्यक्ती या अनोळखी मयत व्यक्तीला ओळखत असतील तर त्यांनी सोनखेड पोलीसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी. सोबतच सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांचा मोबाईल क्रमांक 9970775446 आणि पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार यांचा मोबाईल क्रमांक 9823373495 यावर सुध्दा मयत अनोळखी व्यक्तीची माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *