नांदेड(प्रतिनिधी)-7 डिसेंबरला रात्री झालेल्या घटनेत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सुध्दा जिवघेणा हल्ला असा प्रयत्न लिहिलेला आहे. या गुन्ह्यात सुध्दा 24 आरोपींची नावे आहेत. त्यापैकी 2 जणांना इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.
दि.7 डिसेंबर रोजी आपले कामकाज करून रात्री 10 वाजेच्यासुमारास घरी जात असतांना हबीब टॉकीजजवळ माझ्यावर हल्ला झाल्याची तक्रार 8 डिसेंबर रोजी अजिज खान फैजुल्ला खान (44) यांनी पोलीस ठाणे इतवारा येथे दिली.
त्यावेळी 70 ते 80 माणसांच्या जमावाने माझ्यावर दगड, विटा, तलवारी आणि गजाळी घेवून जीवघेणा हल्ला केला. अजिज खानने आपल्या तक्रारीत मंगेश रमेशराव पुरंदरे, सुनिलसिंह परमार, आकाश ठाकूर, प्रेम परदेशी, अर्जुन परदेशी, दिनेश परदेशी, दिपक ठाकूर, अजयसिंह ठाकूर, संतुसिंह ठाकूर, शिवा ठाकूर, शिवा ठाकूरचा भाऊ, लखन कछवा, कुणाल, दिपू ठाकूर, राजा कुकडे, गुरमितसिंघ, बरजोर ठाकूर, करण, चंदन, गोपाल, गोविंद, शुभम, गिरधर ठाकूर आणि बलदिप यांच्यासह हा जमाव होता. मी जखमी होवून खाली पडल्यानंतर मला देगलूर नाका येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
महमंद अली रोडवर पान दुकान असलेल्या फेरोजखान लतिफ खान पठाण यांची फे्रंडस पान शॉप 8 डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात लोकांनी जाळल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. कांही जण गुपचूप एका जागी थांबून एका दुकानासमोरच्या ओट्यावर पेट्रोल टाकतांना दिसतो आणि नंतर दुसरा येतो आणि त्यास आगलावून जातो असे चित्रीकरण त्या व्हिडीओत आहे.
या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी 24 जणाच्या नावांसह 70 ते 80 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा क्रमांक 298/2021 असा आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्तेपोड यांच्याकडे देण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुन्हा क्रमांक 298 मध्ये संतोष टाकणखार आणि विशाल अग्रवाल या दोन जणांना पोलीसांनी अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
इतवारा भागात घडलेल्या 7 डिसेंबरच्या घटनेत दुसरा जीवघेणा हल्याचा गुन्हा दाखल