गाडीपुरा भागातील 15 जणांना 2 दिवस पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-गाडीपुरा भागात दंगल माजवणाऱ्या 15 जणांना आज 9 डिसेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
7 डिसेंबरच्या रात्री इतवारा भागातील गाडीपुरा, छोटी दर्गा परिसर या भागात दंगल घडली. या प्रकरणी इतवारा पोलीसांनी 297/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला. आज 9 डिसेंबर रोजी शेख असद आणि त्याचे सहकारी पोलीस अंमलदार चंद्रकांत मांडवकर, बालाजी पवार, केंद्रे आणि आरसीपीचे अनेक जवान  यांनी पकडलेल्या 13 जणांना न्यायालयात हजर केले. पकडलेले 13 जण सय्यद आतिख सय्यद नफीज (30), सय्यद जाकीर सय्यद युसूफ (25), फेरोज खान सादीक खान(31), मुस्तफा खान उर्फ सलमान खान सादीक खान (18), सरफराज खान सादीक खान (20), मोहम्मद नासेर हुसेन मोहम्मद जफर हुसेन (21), मोहम्मद अदेय हुसेन माहेम्मद मुक्तार हुसेन(19), शाहीद अहेमद नजीर अहेमद (22), मोहम्मद इनाम मोहम्मद शाकीर (31), मोहम्मद अफजल मोहम्मद अन्वर(31), शेख इमाम हुसेन साब (31), सय्यद आलीद सय्यद माजीद (19), सय्यद माजीद सय्यद इमामोद्दीन (35) सर्व रा.गाडीपुरा यांना  न्यायालयाने सादर केलेला युक्तीवाद लक्षात घेवून 13 जणांना जणांना दोन  दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. याच न्यायालयात गुन्हा क्रमांक 298 मधील अटक असलेले संतोष सतीशराव टाकणखार आणि विशाल राजकुमार अग्रवाल यांना सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.मूत्येपोड अमी त्यांच्या सहकारी पोलीस अमंलदारानी न्यायालयात हजर केले होते.त्यांना सुध्दा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.अर्थात आजचे सर्व पंधरा जण ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *