नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ मधील पोट निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 अ चौफाळा, मदिनानगर पोट निवडणुक 2021 दरम्यान आज 9 डिसेंबर 2021 अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता या पोट निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसच्यावतीने मुस्कान नाज सय्यद वाजिद, भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे, एमआयएमच्यावतीने रेशमा बेगम सलीम बेग असे तीनच उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आता प्रभाग क्रमांक 13 अ ची पोटनिवडणुक तिरंगी लढत होणार आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पोट निवडणुकीदरम्यान 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
Related Posts
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्हा कारागृहात अधीक्षक सुभाष सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कारागृह…
गुरुद्वारा बोर्डाच्या 12 जून आणि 13 जून 2019 च्या बैठका महसुल मंत्र्यांनी रद्द केल्या
आक्षेपक आणि समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डावर प्रशासकीय समितीची स्थापना झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीवर गुरूद्वारा बोर्डाच्या…
आर ऍन्ड बी कंपनी वेळेवर वेतन देत नाही म्हणून सफाई कामगारांनी पहाटेपासूनच पुकारले काम बंद आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरात साफसफाई करणाऱ्या कामगारांनी आज सकाळपासून संपाचे आंदोलन सुरू केले असून काम केले नाही. यामुळे शहरभर कचऱ्यांचे ढिग…