नांदेड(प्रतिनिधी)-सायखेड ता.धर्माबाद येथील एका आडत दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी 41 क्विंटल 80 किलो असे 2 लाख 71 हजार 700 रुपयांचे सोयाबीन चोरून नेले आहे.
प्रल्हाद मारोतराव मारगोंडे रा.विळेगाव ता.धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मारोती ट्रेडींग नावाची आडत दुकान मौजे सायखेड ता.धर्माबाद येथे आहे. 8 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी गेले. 11 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजता त्यांना आपल्या दुकानाचे शटर वाकवलेले दिसले. त्यातून 76 पोते सोयाबीन ज्याचे वजन 41 क्विंटल 800 किलो आहे. ते कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. 6500 रुपये प्रति क्विंटल दराने या चोरीच्या सोयाबीनची किंमत 2 लाख 71 हजार 700 रुपये होते. धर्माबाद पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माधव वाडेकर अधिक तपास करीत आहेत.
2 लाख 72 हजारांचे सोयाबीन चोरले