नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या पाच दुचाक्या एलसीबीने पकडल्या;एक गाडी नायगाव हद्दीतील

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या पाच दुचाकी गाड्या आणि नायगाव येथून चोरीला गेलेली एक दुचाकी गाडी अश्या सहा गाड्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्या आहेत.एक चोरटा नांदेड ग्रामीण आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक नायगाव पोलिसांच्या कडे दुचाकी गाड्यासह स्वाधीन करण्यात आले आहेत.
                         स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या विभागातील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस हअंमलदार संजय केंद्रे,संग्राम केंद्रे, पद्मसिंह कांबळे रुपेश दासरवार,हेमवती भोयर , बालाजी यादगिरवाड,गणेश धुमाळ आणि चालक हेमंत बिचकेवार यांना पंचशील नगर एमआयडीसी सिडको येथून रोहित प्रल्हाद कांबळे (२४) यास ताब्यात घेण्यास सांगितले.पोलीस पथकाने त्याच्या सोबत एक विधी संघर्षग्रस्त बालक पण ताब्यात घेतला. या पैकी विधी संघर्षग्रस्त बालकाने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरून आणलेली आहे. तर रोहित कांबळेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५ दुचाकी गाड्या चोरल्या आहेत.प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण येथे तीन गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने पाच दुचाकी गाड्यांसह रोहित कांबळेला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.तसेच विधी संघर्षग्रस्त बालकाला एका दुचाकीसह नायगाव पोलिसांना दिले आहे. या सर्व दुचाकी गाड्यांची किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे.
                         पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *