नांदेड(प्रतिनिधी)- किनवट येथे एका बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातून रोख रक्कम चोरीला गेली नाही. पण मशीनचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
संदीप मोतीराम दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 डिसेंबर रोजी बुलढाणा अर्बन कॉपरेटीव्ह के्रडीट सोसायटीचे नेहरुनगर किनवट येथील एटीएम फोडून दोन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात एटीएम पुर्णपणे फुटले नाही पण एटीएम मशीनचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद भागात राजेंद्र मोतीलाल शर्मा यांची न्यायालयाच्या पाठीमागे उभी केलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.1154 2 डिसेंबरला चोरीला गेली. कामठा बु. येथून नरेश गंगाधर पुयड यांची 80 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही.3850 ही 22-23 डिसेंबरच्या रात्री चोरीला गेली.
किनवट येथे एटीएम फोडले ; न्यायालय आणि कामठा (बु) येथून दोन दुचाकी चोरी