नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी त्यांच्या हद्दीतील डॉ.आंबेडकरनगर भागात जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकला. ही घटना खुप छान झाली. पण या गुन्ह्यामध्ये तेथे सापडलेल्या लोकांमधील कॉंगे्रस नगरसेवकाच्या पुत्राला कॉंग्रेस नगरसेवकाच्या सोबत पोलीस स्टेशनमधून परत पाठवून दिले. त्याचे नाव गुन्ह्यात नाही. तसेच तीन जण तेेथे हजर नसतांना त्यांचे नाव या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकामध्ये कार्यरत पोलीस ंअंमलदार रामकिशन पांडूरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 ऑक्टोबर 2021 (मुळात काल तारीख 13 डिसेंबर 2021 होती.) रोजी रात्री 11.55 वाजेच्या सुमारास डॉ.आंबेडकरनगर भागातील बौध्द विहाराच्या बाजूस सार्वजनिक ठिकाणी जुगाराचा खेळ चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, पोलीस उपअधिक्षक रोडे, पोलीस अंमलदार मुंडे, लियाकत शेख, जगताप, डोंगरे, आवातिरक आदी पोलीस तेथे पोहचले आणि त्यांनी जुगार खेळणाऱ्या शेख माजीद शेख अहमीद (25), सिध्दार्थ भिमराव कसबे (42), अमदखान फेरोज खान (25), राजेश पांडूरंग कुऱ्हे (31), संजय जळबाजी कांबळे(52), भुषण गौतम सावंत (31), महेश मोहनराव पंडीत(25) हे लोक पोलीसांना सापडले आणि आम्हाला पाहुन पळून जाणारे प्रशांत सोनकांबळे, मनिष गौतम सावंत आणि कुंदन उर्फ राधे प्रकाश सुर्यतळ हे असल्याचे तक्रारीत लिहिले आहे. त्यांच्याकडून 5 हजार 120 रुपये रोख रक्कम आणि बदक छाप पत्ते जप्त करण्यात आले आहेत. या तक्रारीमध्ये क्रमांक 8,9 आणि 10 पळून गेले असे लिहिले आहे. पण तक्रार 1 ते 10 बद्दल महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अ प्रमाणे असल्याचे लिहिले आहे.
पकडलेल्या सर्वांना कांही तासात जामीन देण्यात आला. जामीन झालेल्या मंडळींपैकी सर्वच जण सांगत होते की, प्रशांत सोनकांबळे, मनिष गौतम सावंत, कुंदन उर्फ राधे प्रकाश सुर्यतळ हे लोक जुगार खेळण्याच्या जागी उपस्थितीच नव्हते. सोबतच जामीन झालेले कांही जण सांगत होते की, एका कॉंगे्रस नगरसेवकाचा मुलगा आमच्यासोबत जुगार खेळत होता त्यालापण पोलीस ठाण्यात नेले होते. पण दुसरा एक कॉंगे्रस नगरसेवक आला आणि कॉंगे्रस नगरसेवकाच्या मुलाला घेवून गेला. त्यामुळे त्याचे नाव एफाआयआरमध्ये आलेले नाही. ज्या जुगार खेळणाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेंव्हा सर्व जुगाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर पाठवले त्यावेळी एका पोलीसाला पोलीस निरिक्षकांनी तु वर जायचे नाही थेट गाडी चालू करून स्वत:च्या घरी जा असे सांगितले. याचा अर्थ काय असेल? पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी पाहुन पळून गेलेल्यांची नावे स्वत: तपासून ते खरेच असतील तर त्यांच्यावर जरुर कार्यवाही करावी पण नसतील तर कोणी त्यांची नावे टाकली याचा शोध जरूर घ्यावा.
कॉंगे्रस नगरसेवकाच्या मुलाला जुगार छाप्यात पकडून पोलीस ठाण्यातून सोडून दिले