नविन नांदेड(प्रतिनिधी)-पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सिडको वाघाळा काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या वतीने वाढविण्यात आलेल्या पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ उद्या दिनांक ७ जुंन रोजी सकाळी ११ वाजता पेंसलवार पेट्रोल पंप आंबेडकर चौक लातूर फाटा सिडको येथे धरणे आंदोलन करण्यात आले सदरील धरणे आंदोलन निषेधार्थ युवा नेते तथा आमदार मोहनराव हंबर्डे यांचे पुत्र राहुल भैय्या हंबर्डे , अध्यक्ष विनोद कांचनगिरे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश क्रागेस कमिटीच्या वतीने राज्यात प्रेट्रोल व डिझेल,गस मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने केंद्रशासनाने तात्काळ कमी करण्याची मागणी केली. केंद्रशासनाच्या वाढीव दराबाबत निषेध करण्यात आला ,या वेळी माजी नगरसेवक संजय मोरे, सिध्दार्थ गायकवाड, डॉ.करूणा जमदाडे, प्रा.ललीता शिंदे,ऊदय देशमुख, डॉ.नरेश रायेवार, राजु लांडगे ,शेख मोईन लाठकर, डॉ.रमेश नांदेडकर,प्रमोद टेहरे,भुंजग स्वामी,के.एल.ढाकणीकर,शेख अस्लम,भि.ना.गायकवाड, प्रेसनजीत वाघमारे,एस.पी.कुंभारे, संजय श्रीरामे, अनिता गजेवार,कविता चव्हाण,त्रिशाला कांबळे,विमल चिते, सुनीता राठोड, सुमन पवार,व काँग्रेस ब्लॉक कमिटीच्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.या वेळी ईधनदर भाव वाढ कमी झालीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत प्रंचड घोषणा करण्यात आल्या.
आंदोलन चा पार्श्वभूमीवर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी साहयक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, उपनिरीक्षक गोविंद खैरे,हि.के.नरवटे यांच्या सह गोपीनीय शाखेचे ,संजय जाधव,संजय चाटे व कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेधार्थ नविन नांदेड भागात आंदोलन