गंगाचाळ परिसरात खून करणारे चार मारेकरी ७२ तासात गजाआड

एक विधी संघर्षग्रस्त बालक;वजिराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी
नांदेड,(प्रतिनिधी)- गंगाचाळ परिसरात खून करून पळून गेलेल्या पाच जणांना वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुसद तालुक्यातील एका गावातुन पकडून आणले आहे.या मारेकऱ्यांमधील एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे.मारेकऱ्यांना पोलिसांनी ७२ तासातच जेरबंद केले आहे.
                          शहरातील मार्कंडेय मंदिराजवळ राहुल बाबूराव गायकवाड (35) यास आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी चाकू भोकसून खून केल्याचा प्रकार १२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री घडला होता.राहुलचे बंधू मिलिंद गायकवाड यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा क्रमांक ४५०/२०२१ दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला.
                          खून झाला आणि पोलिसांनी आरोपी शोधले नाही,असे होत नाही त्यानुसार वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांना मारेकऱ्यांना पकडण्यासाठी आदेशीत केले.तेव्हा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार संतोष बेल्लूरोड,शरदचंद्र चावरे,व्यंकट गंगुलवार,शेख इम्रान, मनोज परदेशी,विजयकुमार नंदे, बालाजी कदम, गजानन किडे आदींनी आपल्या माहितीगारांकडून आणि तांत्रिक माहितीच्या आधारवर खून करणारे मारेकरी मौजे फेंड्रॉ ता.पुसद जिल्हा यवतमाळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली.आज पहाटे गुन्हे शोध पथकाने सुधाकर साहेबराव इंगोले (२०), अविनाश उर्फ बाटल्या साहेब इंगोले(२३),शुभम साहेबराव इंगोले (१९) आणि एक १३ वर्षांचा विधी संघर्ष अश्या चार जणांना नांदेडला आणले आहे.या खून प्रकरणाच्या तक्रारीत पाच जणांची नावे फिर्यादीने लिहिलेली आहेत.
               आता पुढील कायदेशीर कार्यवाही होणार आहे. खून करणाऱ्या मारेकऱ्यांना वजिराबाद पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केले आहे.पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *