नांदेड(प्रतिनिधी)-एका 85 वर्षीय माणसाची एक ग्रॅम सोन्याची अंगठी वसंतनगर भागात चोरट्यांनी 16 डिसेंबरच्या रात्री लुटली आहे. तसेच कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कहाळा खुर्द शिवारात एका महिलेला खाली पाडून तिची 30 हजारांची सोन्याची पोत व कानातील सोन्याचे रिंग बळजबरीने तोडल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड शहरातील सुंदरनगर भागातून एक 17 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे.
आनंदराव बापूराव चव्हाण (85) रा.मगनपुरा हे 16 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास राजर्षी शाहु विद्यालय जवळील पांडूरंग राजेगोरे यांच्या घरासमोरून पायी जात असतांना एका दुचाकी गाडीवर दोन जण आले. त्यांना म्हणाले तुमचा मुलगा पंजाबला असतो तो आम्ही ओळखतो. तुमच्या बोटातील अंगठीचा नंबर घायचा आहे म्हणून त्यांच्याजवळ आले. पण मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्हाला नंबर द्यायचा नाही असे आनंदराव चव्हाण यांनी सांगितल्यावर एका आरोपीने त्यांचे तोंड दाबून ठेवले आणि दुसऱ्याने त्यांच्या हातातील 40 हजार रुपये किंमतीची अंगठी बळजबरीने चोरून दुचाकीवर बसून अंधारात पळून गेले. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
मौजे कहाळा खुर्द येथील सुशीलाबाई शामराव कारताळे (50) यास महिला 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पायी चालत असतांना दोन जणांनी त्यांना पाठीमागून धक्कादेवून खाली पाडले. एकाने त्यांच्या गळ्यातील पोत आणि कानातील रिंग काढून घेतले. या ऐवजाची किंमत 30 हजार रुपये आहे. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पेालीस उपनिरिक्षक संजय अटकोरे हे करीत आहेत.
आनंद दिगंबरराव सवंडकर या विद्यार्थ्याची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.8319 ही 1-2 डिसेंबरच्या रात्री त्यांच्या घरासमोरून, सुंदरनगर येथून चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार कुरूळेकर हे करीत आहेत.
85 वर्षीय माणसाची अंगठी बळजबरीने चोरली; 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील पोत बळजबरीने चोरली; दुचाकी चोरी