खांडल समाजाने प्रत्येक गरजवंताला मदत करावी-आ.गोवर्धन शर्मा 

नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक माणसाला मदत करणे हे खांडल समाजाचे काम आहे. त्यावर राज्यातील सर्व खांडल बंधूंनी एकत्रीत काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन अकोला विधानसभा मतदार संघातील सलग सहा वेळा आमदार असलेले आ.गोवर्धन शर्मा यांनी केले.
आज अकोला शहरातील माहेश्र्वरी भवन येथे अखिल भारतवर्षीय विप्र महासभा पुष्कर, राजस्थान या मातृसंस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेच्या नुतन कार्यकारणी शपथग्रहन समारंभात आ.गोवर्धन शर्मा बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महासभा अध्यक्ष रामेश्र्वरलाल सोती, माजी महासभा अध्यक्ष मुरारीलाल गोरसीया, महाराष्ट्राचे नुतन अध्यक्ष जयप्रकाश रुथला, माजी अध्यक्ष बंकटलाल रिणवा यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना आ.गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी म्हणाले महाराष्ट्रात आम्ही श्रीराम जयंती सर्व ब्राम्हण समाजाला एकत्रीत घेवून साजरी केली. त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये श्रीराम जयंती सर्व ब्राम्हण समाज एकत्र येवून साजरी करतात. महाराष्ट्र सभेने आप-आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना मदत करावी. शैक्षणिक गरजांना मदत करावी. संपूर्ण समाजाला मदत करावी हे सांगतांना आ.गोवर्धन शर्मा म्हणाले मी समाज म्हणजे असा उल्लेख करतो आहे की, प्रत्येक गरजवंताला मदत करा.
याप्रसंगी महासभेचे अध्यक्ष रामेश्र्वर सोती म्हणाले समाज एकत्र जोडला पाहिजे. मोबाईलमधल्या अनावश्यक बाबींवर लक्ष न देता, समाज एकत्रीत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. खांडल समाजात समोर येणाऱ्या घटस्फोट विषयक घटनांबद्दल बोलतांना सोती म्हणाले आम्ही सर्वांनी एकत्रीत पणे संसार जोडण्याचे काम केले पाहिजे. याप्रसंगी महाराष्ट्राचे नुतन अध्यक्ष जयनारायण रुथळा म्हणाले प्रदेश संघटनेचा विकास हा ध्येय समोर ठेवून मी सर्वांच्या मदतीने हे काम पुढे येणार आहे. शैक्षणिक, आरोग्य सुविधा जास्तीत जास्त लोकांना कशा देता येतील याबाबत प्रयत्न करणार आहे. खांडल समाजातील युवकांच्या व्यक्तीमत्व विकासाचे प्रयत्न करणार आहे.प्रदेश संघटनेचे जनगणणा करून घेणार आहे.
या कार्यक्रमात भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. नुतन विधान परिषद सदस्य आ.वसंत खंडेलवाल यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती संजय शर्मा, ऐरंडा गावचे सरपंच पवन शर्मा, डॉ.अनुप जोशी, डॉ.पालगुणी नवहाल, डॉ.भुमिका पिपलवा, दामोधर काछवाल, शामजी गोवला, सचिन झुनझुनोद्दीया, ग्यारसीलाल शर्मा, सत्यनारायण जोशी, डॉ.मदनलालजी शर्मा, डॉ.पियुश शर्मा, विजय तिवारी, रामगोपल रिणवा, राजकुमार रिणवा, बच्छराज चोटीया, ब्रिजमोहन रिणवा, हुकूमचंद मंगलीहारा आदींचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश संघटनेचे माजी कोषाध्यक्ष दामोधर काछवाल यांनी 17 लाख 94 हजार 266 रुपयांचा हिशोब सादर केला आणि त्यातील जमा आवधी, बॅंकेत असलेली रक्कम आदी नुतन अध्यक्षांच्या स्वाधीन केले. नवीन कार्यकारणी जाहीर झाली तेंव्हा नवीन कोषाध्यक्ष पदी दामोधर काछवाल यांची नियुक्ती झाली. प्रदेश संघटनेच्या महासचिवपदी शांतीलाल काछवाल यांना जागा देण्यात आली. युवा अध्यक्ष या पदावर ओमप्रकाश झुनझुनोद्दीया यांना स्थान मिळाले, महिला अध्यक्षपदावर सुनिता पिपलवा यांची वर्णी लागली. कार्यालय सचिव पदावर रामनिवास पिपलवा, सहसचिव पदावर गोपाल चोटीया, सहकोषाध्यक्ष पदावर लक्ष्मीकांत बोचीवाल यांची नियुक्ती झाली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अत्यंत उत्कृष्ट शब्दात अरुण मोटोलीया यांनी केले. महाराष्ट्रातील नुतन कार्यकारणीमध्ये अर्धाडजन कार्याध्यक्ष, एक डजन उपाध्यक्ष, खंडीभर सचिव आणि दोन खंडी सदस्य नियुक्त करण्यात आले.
नांदेड खांडल शाखा सभेच्या निवडणुकीवर आक्षेप 
दि.10 डिसेंबर रोजी नियमावलीची पायमल्ली करून नांदेड खांडल विप्र शाखा सभेचे निवडणुक घेण्यात आली होती. निवडणुकीच्यावेळी निवडणुकीतील उमेदवार गोपीकिशन पिपलवा यांनी आक्षेप घेवून निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे निषेध व्यक्त केला होता. तरीपण बेकायदा निवडणुक जाहीर झाली. आज अकोला येथे या निवडणुकीवर आक्षेप घेत नांदेड खांडल विप्र शाखा सभेवर प्रशासकीय अध्यक्ष नियुक्त करावा असे एक निवेदन नुतन अध्यक्ष जयनारायण रुथळा यांना देण्यात आले. या निवेदनावर नांदेड येथील खंडेलवाल समाजाच्या जवळपास 25 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *