16 मोबाईल एक दुचाकी जप्त ; ऐवजाची किंमत 83 हजार 100 रुपये
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने चोरलेले 16 मोबाईल आणि एक दुचाकी गाडी घुुंगराळा येथील एका चोरट्याला पकडून जप्त केली आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेले 16 मोबाईल आणि वजिराबाद नांदेड येथून चोरीला गेलेल्या एका दुचाकीचा यात समावेश आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीआधारे साहेबराव शंकरराव ढगे हा चोरटा घुंगराळा ता.नायगाव येथे असल्याची माहिती मिळाली. आपल्या शाखेतील पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, रणधिर राजबन्सी, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवाड यांना त्यास पकडण्यासाठी पाठविले. पोलीस पथकाने साहेबराव शंकरराव ढगे (22) यास ताब्यात घेवून विचारणा केली असता त्याच्याकडे असलेला चोरीचा मोबाईल त्याने माणिक उर्फ अर्जुन तोलबा ढगे रा.घुंगराळा याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. माणिक उर्फ अर्जुन ढगेला पोलीस पथकाने पकडले तेंव्हा मौजे घुंगराळा येथील एक मोबाईल शॉपी फोडून त्यातील 33 हजार 100 रुपयांचे 16 मोबाईल चोरले होते. ते जप्त करण्यात आले. सोबतच त्या ने वजिराबाद भागातून चोरलेली एक दुचाकी 50 हजार रुपये किंमतीची जप्त करण्यात आली. माणिक उर्फ अर्जुन तोलबा ढगेला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुंटूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा पकडला