नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील अभियंता गिरीश कदम यांना शासनाने अतिरिक्त आयुक्त संवर्गातील एक पद निर्माण करून पदोन्नती दिली आहे. या निर्णयावर नगरविकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेले अभियंता गिरिश जांबुवंतराव कदम हे कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त संवर्गातील एक पद जून 2021 मध्ये निर्माण केलेले आहे. त्या अतिरिक्त आयुक्त पदावर गिरीश जांबुवंतराव कदम यांच्या नावाची शिफारस महानगरपालिकेने केलेली आहे. या सर्व प्रक्रियेत गिरीश कदम यांना अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार गिरीश कदम यांनी स्विकारावा असे या आदेशात नमुद आहे. शासनाचा हा निर्णय संकेतांक क्रमांक 202112201811260425 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. नांदेड येथील गिरीश कदम यांचे नातलग, मित्र परिवार यांच्यावतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नांदेड मनपामध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर गिरीश कदम यांची नियुक्ती