नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीसांनी आणि कुंचेली तलाठी सज्जाचे तलाठी यांनी संयुक्तरित्या एक टिप्पर पकडला. त्यामध्ये अवैधरित्या वाळू चोरून नेली जात होती.
सिध्देश्र्वर कोकरे तलाठी सज्जा कुंचेली ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21 डिसेंबर 2021 रोजी रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव यांनी सांगितल्यानंतर कुंचेली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टिपर क्रमांक एम.एच.26 ए.जे.1769 पकडला. त्यामध्ये बेकायदेशीररित्या चोरून नेत असलेली वाळू होती. या प्रसंगी पोलीस उपनिरिक्षक एल.आर.शेख , पोलीस अंमलदार बंदखडके, हबीब हे सुध्दा हजर होते. 6 लाख रुपयांचा टिप्पर आणि 10 हजार 500 रुपयांची चोरीची वाळू यात आहे. रामतिर्थ पोलीसांनी या गाडीचा चालक अर्जुन धोंडीबा डोंगरे आणि टिप्पर मालक ज्ञानेश्र्वर एकनाथ कापसे रा.कौठा या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.