नांदेड,(प्रतिनिधी)- काल पुन्हा एकदा जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी निवडणुकीच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत बोढार शिवारात अवैध्य बायो डिझेल विक्री केंद्रावर धाड टाकायचे आदेश दिले.काल सायंकाळी तहसीलदार आणि त्यांचे सहकारी तसेच काही पोलीस यांनी एम के नावाच्या दुकानावर छापा टाकला आहे.चोवीस तासात परत एकदा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध्य धंदे जोरात असतातच हे सिद्ध झाले आहे.
परवा २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी संयुक्तरित्या वाजेगाव पोलीस चौकीच्या पाठीमागे सुरु असलेला अवैध्य बायो डिझेलचा पंप पकडला.त्या घटनेला ३० तासच उलटले असतांना काल दिनांक २१ डिसेंबर रोजी डॉ.विपीन यांच्या पथकाने बोढार शिवारातील वळणरस्त्यावर असलेल्या पूला जवळ एक अवैद्य बायो डिझेल विक्री केंद्रावर छापा टाकला.या ठिकाणी एम.खान आणि एम.के.ऑफिस असे लिहिलेले बोर्ड आहेत.या ठिकाणी मोठा बायो डिझेल साठा सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे. परवाच्या प्रकरणातील एका आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.त्याला कोठडीत बंद करण्याच्या वेळेतच दुसरा प्रकार घडला आहे.
आज २२ डिसेंबर रोजी याबाबत माहिती घेतली असतांना अद्याप कोणताही गुन्हा मात्र दाखल झालेला नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी हा छापा टाकून अवैध्य बायो डिझेल विक्री केंद्रांवर वाचक यावा यासाठी केलेली मेहनत नक्कीच प्रशंसनीय आहे.पण हे अवैध्य धंदे कोणाच्या जोरावर चालवले जातात याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी डॉ.विपीन शोध घेतील आणि त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
