नांदेड,(प्रतिनिधी)- काल भर दिवसा हमाल युवकाचा खून करणारा मारेकरी वजिराबाद पोलिसांनी गजाआड केला आहे.
काल मुरमुरा गल्लीत हमाल युवक लखन उत्तम जाधव (30) रा.देवापुर ता.मुदखेड याच्या छातीत चाकू भोकसून खून करण्याचा प्रकार घडला होता.याबाबत वजिराबाद पोल्सी ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक सुरजितसिंघ माळी आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी लखनचा मारेकरी अनिल नामदेव जोंधळे रा.सिडको यास पकडले.या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला आहे.