नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत झालेल्या प्रभाग क्र.१३ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविला आहे.
नांदेड शहरातील चौफाळा/मदिनानगर भागात प्रभाग क्र.१३ येथे रिक्त झालेल्या जागेवर काल दि.२१ डिसेंबर रोजी मतदान झाले. आज दि.२२ डिसेंबर रोजी या मतदानाची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुस्कान नाज सय्यद वाजीद यांना ४ हजार २३० मते मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मीबाई बाबुराव जोंधळे यांना १४९० मते मिळाली. ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) च्या रेश्मा बेगम सलीम बेग यांना २२२५ मते मिळली. या निवडण्ुाकीत वरीलपैकी एकही नाही (नोटा) ला ९४ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुस्कान नाज सय्यद वाजीद यांना या पोटनिवडणुकीत विजयी घोषित केले. ही निवडणूक जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होती.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये काँग्रेसच्या मुस्कान नाज सय्यद वाजेद यांचा विजय