नांदेड,(प्रतिनिधी)-मुरमुरा गल्लीमध्ये काल दि.२१ डिसेंबर रोजी दिवसा एका युवकाचा खून करणाऱ्या दुसऱ्या युवकाला प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी मल्हारी शिंदे यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुरमुरा गल्लीमध्ये दारु पित बसलेल्या दोन युवकांमध्ये भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसन पुढे रस्त्यावर येवून त्याठिकाणी लखन जाधव (३०) रा.देवापूर ता.मुदखेड यास अनिल नामदेव जोंधळे (२२) रा.सिडको नांदेड याने चाकूने छातीवर भोसकुन त्याचा खून केला.
पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात २१ डिसेंबर रोजी रात्री अनिल नामदेव जोंधळेला अटक झाली. आज दि.२२ डिसेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे, पोलीस अंमलदार राठोड, पत्रे, मुंढे, पवार, बनसोडे, शिकरे आणि भालेराव यांनी अटकेत असलेल्या अनिल नामदेव जोंधळेला न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडीची विनंती केल्यानंतर न्यायाधीश शिंदे यांनी मारेकरी अनिल जोंधळेला चार दिवस अर्थात २५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.