नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस अंमलदाराच्या वेतनातील फरक आपल्या समोर आल्यांनतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ज्या पोलीस अमलदारांचे वेतन कनिष्ठ अंमलदारा पेक्षा कमी आहे.त्यांचे वेतन कनिष्ठ पोलीस अंमलदारा एवढे करावे असा आदेश पारीत केला आहे.या आदेशाने पोलीस अंमलदाराच्या वेतनातील फरक आता लवकरच समाप्त होणार आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील पोलीस अंमलदाराच्या वेतनातील फरकाबाबत पोलीस अमलदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे वेतन फरकाच्या तक्रारी आल्यानंतर त्याची चौकशी झाली तेव्हा सुधारित वेतन आयोग लागू झाल्यानंतर नवीन वेतन निश्चिती करतांना घोटाळा झाला आणि पोलीस अमंलदारच्या वेतनात फरक आला.
ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेने अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार सुधारित वेतन नियम २०१९ नुसार जे पोलीस अंमलदार पदोन्नती झाल्यावर त्यांचे वेतन वरिष्ठ पोलीस अमलदारांपेक्षा जास्त दिले जात आहे.अश्या वरिष्ठ पोलीस अंमलदारांना कनिष्ठ पोलीस अमलदारांच्या बरोबरीचे वेतन देण्यात यावे.सोबतच ते वाढीव वेतन देण्यासाठीची वेतन उंचावण्याची कार्यवाही सुद्धा करावी.वाढवून दिलेले वेतन वेतन पडताळणी पथकांकडून प्रमाणित पण करून घ्यावे,असे या आदेशात नमूद आहे.आदेशाच्या प्रती राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना पाठवण्यात आल्या आहेत.
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक पोलिसांच्या वेतनात आलेला फरक आता शिल्लक राहणार नाही.आपल्या पदाच्या अनुरूप असे वेतन त्यांना मिळणार आहे.पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या कार्यवाहीची पोलीस अमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.