नांदेड (प्रतिनिधी)-बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या तथाकथीत महाराष्ट्र भूषणाचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. या क्रियेतून येणाऱ्या प्रतिक्रिया अत्यंत मजेशिर आहेत. विशेष करून महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वस्त धान्याचा कारभार करणारी मंडळी असे अनेक जण पोलीस संरक्षण काढण्याच्या या कृतीबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.
नांदेडमध्ये एका समितीच्या नावाने नोंदणी करुन दुसऱ्याच नावाची समिती स्थापन करणाऱ्या तथाकथीत बोगस महाराष्ट्र भूषणाला देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढण्याची एक दमदार कृती पोलीस विभागाने केली आहे. हे संरक्षण काढण्याअगोदर त्याचा अहवाल तयार करण्यास अनेक जण कच खात होते, कांही जण त्याला पोलीस संरक्षण मिळावे असे प्रयत्न करत होते. त्यातून “धंदा’ सुरू राहणार होता. त्यासाठी सन 2013 च्या एका शासकीय परिपत्रकाचा अर्थ चुकीचा लावला जात होता आणि त्यानुसार त्याला मिळालेले पोलीस संरक्षण कायम होते. पण आता पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. त्यामुळे लपलेली सत्यता बाहेर येईल. खरे तर पोलीस विभागातील लोकांनी त्याचे संरक्षण करतांना ते शासकीय नोकर आहेत याचा विसर त्यांना पडला होता. ते त्याच्या घरचे गडी झाले होते. त्यामुळे सन 2013 पासून सुरू झालेला धंदा अव्याहत चालत राहिला. अनेक पोलीस अधिकारी बोगस पोलीस अधिक्षक बनून त्याला मदत करत होते आणि धंद्याची व्याप्ती डबल होत होती. त्यांना त्यांचे फळ मिळालेले आहे.
बोगस माहिती अधिकारी संरक्षण समितीच्या तथाकथीत संस्थापक अध्यक्षाचे पोलीस संरक्षण काढल्याचा सर्वात जास्त आनंद महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राशन व्यापारी, अनेक असे व्यापारी जे भित्रे आहेत. अशा सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे आता त्यांना लुटण्याचा धंदा बंद होणार आहे. याचा ते मनस्वी आनंद व्यक्त करत आहेत. ज्याने कोणी हे बोगस अध्यक्षाचे संरक्षण काढले आहे त्या व्यक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या व्यक्तीला आशिर्वाद देण्याची रिघ लागली आहे. कोण आहे तो व्यक्ती हे अद्याप कोणाला माहित नाही. तरी पण आशिर्वाद देण्याची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील सुर्याजी पिसाळाचे व्यक्तीमत्व बाळगणाऱ्या लोकांनी आपले ओठ बंद ठेवले तरच छान होईल नसता त्यांचाही नंबर या बोगस अध्यक्षानंतर लागेल.
हा बोगस अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर रा.बरकतपुरा अर्धापूर असा आहे. याने आताच संपलेली अर्धापूर नगर पंचायतीची निवडणुक राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या तिकिटावर वार्ड 3 मधून लढवली होती. याच्याविरुध्द कांही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणुक आयुक्त सुशिल चंद्रा यांनी सांगितले होते की, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांची माहिती तिकिट देणाऱ्या राजकीय पक्षांनीच जनतेसाठी उघड करावी. सोबतच गुन्हे दाखल असतांना सुध्दा त्या का तिकिट दिले. याबद्दलची माहिती जनतेसाठी प्रसारीत करावी. पण राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने या निवडणुक तसे कांही केले नव्हते आणि शेख जाकीर शेख सगीरला आपल्या पक्षाचे तिकिट देवून निवडणुकीत उभे केले होते.
..अखेर शेख जाकीर शेख सगीरचा पोलीस गनर काढलाच