नवीन नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृ त महोत्सवानिमित्त पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला)स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी केले आहे. दि.२८ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी यजमान नांदेड व डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद या दोन्ही संघाने प्रतिस्पर्धी संघावर सहज मात करत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली.
दि.२८ डिसेंबर रोजी परूल विद्यापीठ वाघोड(,गुजरात) व पं.दिनदयाल शेकावती,विद्यापीठ शिकार (राजस्थान) यांच्यात२१-२६ असा अत्यंत चुरशीचा सामना झाला. त्यात पं.दिनदयाल विद्यापीठाने ५ गुणाच्या फरकाने सामना जिंकला.युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर ५४ गुण व महाराजा गंगासिंघ विद्यापीठ, बिकानेर ३८ गुण असा सामना रंगला.त्यात जयपूर संघाने १६ गुण फरकाने
विजय मिळविला.
यजमान नांदेड विद्यापीठाच्या संघाने ३५ व राज रिषी भारत्रिहारी मत्स्य विद्यापीठ, अलवार १८ गुणाची कमाई केली.नांदेड विद्यापीठाने १७ गुण फरकाने विजय मिळविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद संघ ५० गुण व हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ, पाटण २१ गुण असा सामना झाला. त्यात औरंगाबाद विद्यापीठाने ३० गुण फरकाने सामना जिंकला.
या स्पर्धेचा आनंद कुलगुरू डॉ. उद्धव भोसले ,प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन ,कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे ,क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार , प्रा.डॉ. प्रदिप देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ. दिपक बच्चेवार,उत्तम इंगळे आदीनी घेतला.सामन्याचे निरीक्षक प्रा.डॉ. नवनाथ लोखंडे, पंचप्रमुख म्हणून लक्ष्मण बेल्लाळे,सहपंच प्रमुख म्हणून शंकर बुडे ,पंच ज्ञानोबा लहाने ,संजय कांबळे ,रमेश मोहिते ,मेहराज पठाण ,विशाल शिंदे आदीनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रोफेसर डॉ. गंगाधर तोगरे, प्राचार्य डॉ. बळीराम लाड,प्रा.डॉ. गोविंद कलवले ,प्रा.तातेराव केंद्रे आदी परिश्रम घेत आहेत.