विमानतळ पोलीसांनी कॉफी शॉपमधील लोकांविरुध्द हत्यार कायद्याचा गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी एका कॉफी शॉपमधील लोकांकडे बेकायदा हत्यारे सापडल्यानंतर त्यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरिक्षक सावित्रा नारायण रायपल्ले यांनी आनंदनगर चौकातील राज मॉल येथे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कॉफी शॉपमध्ये 28 डिसेंबर रोजी तपासणी केली असता त्या ठिकाणी सय्यद राशेद सय्यद रशीद (24) रा.नाथनगर नांदेड, सय्यद अरशद सय्यद रशीद(27) रा.नाथनगर आणि चंद्रकांत संजय गजभारे (27) रा.प्रकाशनगरजवळ नांदेड हे तीन जण सापडले. त्यांच्याकडे दोन खंजीर सापडले. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांना देण्यात आले. त्यानुसार गुन्हा क्रमांक 388/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *