पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धाः मुंबई -पुणे-नागपूर विद्यापीठाचे संघ साखळी फेरीत दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, विद्यापीठ, नांदेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेचे आयोजन केले आहे. बाद फेरीतून साखळी फेरीत दाखल होण्यासाठी खेळाडू आपले सांघिक कसब सिद्ध करत होते. भारती विद्यापीठ, पुणे.,एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई.,राष्टसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ,नागपूर व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे संघ साखळी फेरीत दाखल झाले आहेत.
भारती विद्यापीठ, पुणे संघाने ४४ व महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा संघाने ३० गुण गुण प्राप्त केले.भारती विद्यापीठाने १४ गुण फरकाने विजय प्राप्त करून साखळी फेरीत प्रवेश केला.एस एन डी टी विद्यापीठ, मुंबई ३६ व युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर २० गुण प्राप्त केले.एस एन डी टी मुंबई संघ १६ गुण फरकाने विजयी झाली. आणि साखळी फेरीत दाखल झाले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे ३७ गुण व मुंबई विद्यापीठ ,मुंबई १९ गुण प्राप्त केले.सावित्रीबाई फुले विद्यापीठाने १८ गुण फरकाने सामना जिंकून साखळीत प्रवेश केला. विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये दि.२९ डिसेंबर रोजी रोमहर्षक सामना झाला.समान गुण झाल्याने प्रत्येक संघाला ५-५ चढाई देण्यात आली.त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर ४२ गुण आणि पं.दिनदयाल शेकावती,विद्यापीठ शिकर (राजस्थान) ४० गुण असा अत्यंत अटीतटीचा सामना झाला.नागपूर विद्यापीठाचा संघ २ गुणाच्या फरकाने सामना जिंकून साखळीसाठी पात्र ठरला.दोन्ही संघातील खेळाडू चढाई,संरक्षण आदी डाव-प्रतिडाव टाकत होते.नागपूर संघाने बाजी मारत साखळी फेरीत प्रवेश केला.
यावेळी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले ,प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन ,व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ. दिपक बच्चेवार,प्रा.उत्तम इंगळे आदीनी प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूचा सत्कार केला.सामन्याचे निरीक्षक प्रा.डॉ. नवनाथ लोखंडे, पंचप्रमुख म्हणून लक्ष्मण बेल्लाळे,सहपंच प्रमुख शंकर बुडे ,पंच ज्ञानोबा लहाने ,संजय कांबळे ,रमेश मोहिते ,काशिनाथ बन ,विशाल शिंदे आदीनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रोफेसर डॉ. गंगाधर तोगरे, प्राचार्य डॉ. बळीराम लाड,प्रा.डॉ. गोविंद कलवले ,प्रा.तातेराव केंद्रे ,प्रा.चरणजितसिंग महाजन, प्रा.डॉ. अभिजित मोरे,प्रा.डॉ. दिलीप माने,प्रा.डॉ. किरण येरावार,प्रा.डॉ. सुभाष गुंडावार आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *